पुणे: प्रसिद्ध चित्रकार सुबोध गोखले यांनी चितारलेले भाजे लेण्याचे चित्र टपाल विभागाच्या पोस्टकार्डवर विराजमान झाले आहे. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून टपाल विभागाने प्रकाशित केलेल्या पोस्टकार्डवर हे चित्र झळकले आहे.

रंगीत पेन्सिल्स वापरून साकारलेले भाजे लेणीचे चित्र ऑरकूट आणि फेसबुक या दोन्ही माध्यमांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले. त्याची दखल घेऊन भारत सरकारने बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर पोस्ट कार्डवर हे चित्र प्रसिद्ध केले. हा त्या चित्राचा बहुमान असून मी केवळ निमित्तमात्र आहे, अशी भावना सुबोध गोखले यांनी व्यक्त केली.

हे चित्र लेणी कोरणाऱ्या अज्ञात शिल्पकारांना समर्पित करत आहे. हा खरा त्या शिल्पकारांचा सन्मान आहे, असे गोखले यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्र सरकारने प्रदर्शित केलेल्या पोस्ट कार्डवर मी रंगीत पेन्सिल्स वापरून तयार केलेले चित्र छापले आहे. हा माझ्या कला कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण आहे. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि रसिकांचे प्रोत्साहन यामुळे हे शक्य झाले. – सुबोध गोखले, प्रसिद्ध चित्रकार