महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामगिरीचा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या सात व्यक्तिमत्त्वांचा रविवारी (१ मे) ‘महाराष्ट्र वैभव’ सन्मानाने गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्रसिद्ध निवेदक-मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांचा समावेश होता.

राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र वैभव’ सन्मान प्रदान करण्यात आले. अशा स्वरूपाच्या सन्मानाचे यंदा दुसरे वर्ष होते. गाडगीळ आणि मुथ्था यांच्यासह नागपूर येथील मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. लोकेंद्र सिंग आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजय महाजन, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळी, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि स्वत:चे यकृत दान करून एमबीबीएसचा अभ्यास करीत अवयवदानासंदर्भात जनजागृती करणारी जळगाव येथील जुही पवार ही युवती अशा सात जणांचा सन्मान करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राला वैेभव वाटावा अशा रत्नांचा महाराष्ट्र दिनी सन्मान करीत आहोत, अशी भावना सी. विद्यासागर राव आणि देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. भजन, अभंग, लावणी, कोळीगीत अशा गीतांचा समावेश असलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा कार्यक्रम उत्तरार्धात सादर झाला.