माझ्या नवऱ्याने भाषणे ठोकलेली तुम्हाला चालतील का? संसदेमध्ये नवरा जाणार की मी जाणार? असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचवेळी नवऱ्याला संसदेच्या परिसरात परवानगी नसते. कॅन्टीनमध्ये बसावे लागते. तुम्हाला कसा खासदार पाहिजे, असा प्रश्नही त्यांनी केला. अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात जाऊन सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन करत आहेत. प्रत्येक आठवड्यात ते एकदातरी बारामती मतदारसंघात सभा घेत आहेत. हाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. त्याचबरोबर विरोधकही सुप्रिया सुळे यांच्या इमानदारीचे कौतुक करतात, असे सुळे यांनी आवर्जून सांगितले.

लेकीसाठी शरद पवार मैदानात; पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय रथ रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. सत्तेत असलेल्या अजित पवार यांना शह देण्यासाठी आता खुद्द शरद पवार यांनी लक्ष घातले असून, रविवारी (३ मार्च) त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

हेही वाचा >>> बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार दोन लाख मतांनी निवडून येतील – संजय काकडे

सुप्रिया सुळे गेली १५ वर्षे बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २००९ साली त्या भाजपच्या कांता नलावडे यांच्या विरोधात सहज विजयी झाल्या. २०१४ साली देशभरात मोदी लाट असताना आणि भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मागे ताकद उभी केली असतानाही सुळे यांनी बालेकिल्ला राखला. लोकसभा २०१९ ला पुन्हा मोदींचा देशभर करिश्मा असताना आणि अमित शहा यांनी बारामतीत सभा घेतल्यानंतरही सुळे या सुमारे दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. त्यात अजित पवार यांनी आखलेली रणनीती महत्त्वाची होती. आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर सर्व समीकरणे बदलली आहेत. खुद्द अजित पवार हे भगिनी सुप्रिया यांच्या पराभवासाठी रणनीती आखत आहेत. त्यासाठी ते पत्नी सुनेत्रा यांनाच निवडणूक रिंगणात उतरवणार हे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> “शरद पवारांची भूमिका कायम मराठा आरक्षणाविरोधात, २३ मार्चला मोर्चा…”, नामदेव जाधवांची शरद पवारांवर टीका

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. लेकीसाठी पवार रिंगणात उतरले असून त्याचाच एक भाग म्हणून पवार यांनी रविवारी (३ मार्च) पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. इंदापूरच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विचारांचा खासदार द्या, असे आवाहन केले. तर सुनेत्रा पवार यांनी तुम्ही समजून घ्यायचे ते घ्या, असे म्हणत उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. त्यांनी इंदापूर पाठोपाठ दौंड आणि पुरंदरमध्येही भेटीगाठीचा सिलसिला कायम ठेवला आहे. त्यामुळे मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला आहे. इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनाही आपोआपच महायुतीचे काम करावे लागणार आहे. गेल्या निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. कुल हे भाजपचे आमदार आहेत. माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे दौंडमधील आहेत. या सगळ्यांना स्थानिक मतभेद विसरून आता सुनेत्रा पवार या उमेदवार असतील तर त्यांचाच प्रचार करावा लागेल. सध्या सुनेत्रा पवार यांनी येथे भेटीगाठी सुरु केल्या आहेत.