पुणे: सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत पाहण्यास मिळत आहे.तर राज्यभरात प्रत्येक पक्षाकडून मेळावे,सभा आणि रॅली आयोजित करण्यात येत आहे.या माध्यमांतून मतदारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वणी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी उद्धव ठाकरे यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

या सर्व घडामोडी दरम्यान शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ आल्या होत्या.त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधून एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थिती बाबत देखील त्यांनी भाष्य केले.

हेही वाचा >>>शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा

उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक करण्यात आल्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,माझी पण गाडी काल चेक करण्यात आली.त्यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना मी प्रोत्साहित केले आणि मला याबाबत आनंद वाटला. मी यावर एक सांगू इच्छिते की,त्यांनी जरूर सर्व चेक कराव,पण मला एक गोष्टीचे आश्चर्य वाटते की,उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.हे दुर्देव असून इतक सुडाच राजकारण सुरू आहे.हे अतिशय चुकीचे असल्याचे सांगत अशा शब्दात महायुती सरकारला त्यांनी टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीत माझा करेक्ट कार्यक्रम झाला होता.पण आता विधानसभा निवडणुकीत मला भरभरून मतदान द्या,असे विधान अजित पवार यांनी केले आहे.त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,सशक्त लोकशाहीमध्ये हे विषय अतिशय गांभिर्याने घेण्यासारखे आहेत.शरद पवार यांनी हा मतदार संघ (बारामती विधानसभा) मागील सहा दशक शून्यामधून उभा केला असून यामध्ये सर्वच योगदान आहे.प्रत्येकाने काही ना काही केल आहे.मी केल असे कधीच म्हणणार नाही.आपण केल आणि प्रत्येकाच योगदान आहे.

हेही वाचा >>>‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार आणि मी परिवारवाद प्रॉडक्ट आहोत,तर शरद पवार यांनी शून्यातून विश्व निर्माण केल आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आणि बारामतीची मायबाप जनता ठरवेल,की काय होईल.पण मला विश्वास आहे.एक पारदर्शक कारभार नवीन पिढीचा एक स्वच्छ चारित्र्याचा एक मुलगा एक नवीन चेहरा म्हणून सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा बारामतीमध्ये पुढे जात आहे,अशा शब्दात अजित पवार यांना त्यांनी टोला लगावला.