आजकाल कोणतीही वस्तु कमी वेळेत दुसर्‍या ठिकाणी पोहोच होण्याचे साधन म्हणजे कुरिअर सेवा आहे. या सेवेचा वापर अनेक जण करतात. आज या सेवेतून पुण्याच्या मार्केटमधील कुरिअर ऑफिसमध्ये चक्क दोन तलवारी आढळून आल्या. यामुळे एकच खळबळ उडाली. या तलवारी पुण्यात कुरिअर मार्फत कोणी मागविल्या आहेत याबाबतचा तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

या घटनेबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१ एप्रिल) आम्हाला पुणे मार्केट येथील एका कुरिअर ऑफिसमधून फोन आला की, एक मोठे पॅकिंग आहे. ते आम्हाला संशयास्पद वाटत आहे. त्यावर आमच्या कर्मचार्‍यांनी पॅकिंग उघडून पाहिले, तर त्यामध्ये तलवारी दिसून आल्या. या तलवारी लुधियाना येथून आल्याचे पॅकिंगवर आहे. तलवारी कोणी मागवल्या आहेत त्याबाबत आमचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील काही दिवसापूर्वी औरंगाबाद येथे अशाच प्रकारे कुरियरच्या माध्यमातून १५ हून अधिक तलवारी मागवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्या देखील लुधियाना येथूनच मागविल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही घटना लक्षात घेता, आमचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.