आम्ही भाई आहोत, असे म्हणत कोयते उगारून दहशत पसरविणाऱ्या टोळक्यावर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या’नुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. कोयतेधारी टोळक्यातील दहा जणांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा- संक्रांतीपर्यंत थंडी आणखी वाढणार; मुंबई, कोकणातही गारव्यात वाढ

टोळी प्रमुख समीर लियाकत पठाण (वय २६, रा. हडपसर) याच्यासह शोएब लियाकत पठाण (वय २०), गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार (वय २२), प्रतीक ऊर्फ एस. के. हनुमंत कांबळे (वय २०), गीतेश दशरथ सोलनकर (वय २१), ऋतिक संतोष जाधव (वय १९), साई राजेंद्र कांबळे (वय २०), ऋषीकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय २४), ऋतिक सुनील मांढरे (वय २२), प्रतीक शिवकुमार सलगर (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा- लोणावळ्यातील वाहतूककोंडी सुटणार; आठ दिवसांत आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांजरी बुद्रुक येथे टोळक्याने नागरिकांना शिवीगाळ करून दगडाने व बेल्टने मारहाण केली. कोयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर मकोकानुसार कारवाई करण्यात आली. समीर पठाण आणि साथीदारांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये दरोडा, मारामारी, चोरी असे गुन्हे दाखल असून दादा हवालदार यास यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजन शर्मा यांच्याकडे मकोकासंदर्भातील अहवाल सादर केला होता.