लोकसत्ता प्रतिनिधी पुणे

पुणे: सिंहगड किल्ला परिसरात एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या खामगाव मावळ येथे ही घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिंहगड रस्त्यावरील किरकीटवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खामगाव मावळ येथील एकमेकांचे नातेवाईक असलेले दहाजण सांबरेवाडी येथील भवानी आई मातेच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. मधमाशांचा हा हल्ला इतका तीव्र होता की हे दहाही जण गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळले होते. गावातील काही नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या या दहा जणांना शोधून काढले आणि तातडीने किरकेटवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा… तेल, वायूचे साठे शोधण्यासाठी स्वदेशी प्रणाली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या संपूर्ण घटनेची तात्काळ दखल घेतली. या घटनेची पोलीस प्रशासनाला तातडीने माहिती दिली आणि जखमी रुग्णांना गरज पडल्यास इतर रुग्णालयात हरवण्याची व्यवस्था देखील त्यांनी केली.