पुणे : दांडेकर पूल भागात कोयता गँगने दहशत माजवल्याची घटना घडली. बहिणीची छेड काढल्याने एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रेयस खंदारे (वय १६, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत पाटील, संकेत लोंढे, प्रमोद कळंबे, बिट्या कांबळे, अनंता खोले, आज्या उर्फ अजित, शुभम गजधने, तसेच अब्दुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस आणि त्याचा मित्र सुभाष चलवादी, सुहास शेरखाने दांडेकर परिसरातून निघाले होते. त्यावेळी अभिजीतने बहिणीची छेड का काढली, अशी विचारणा करुन श्रेयसला मारहाण केली. कोयत्याने श्रेयसवर वार केला. त्यानंतर दांडेकर पूल भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविली. पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर टोळके वैभव मोरे याच्या घरात शिरले. त्याच्या आईला शिवीगाळ केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वाय बी पाटील तपास करत आहेत.
हेही वाचा >>> पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीविहितहानी नाही
दरम्यान, जनता वसाहत भागात तरुणीला कोयता फेकून मारण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी नव्या वाडकर, वैभव मोरे, यश वाघमारे, सम्या कारंडे, गोट्या खंदारे यांच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारादाराची बहीण दूरचित्रवाणी संच रिचार्ज करण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी नव्या वाडकरने तिला कोयता फेकून मारला. तरुणीने कोयत्याचा वार हुकविला. पोलीस उपनिरीक्षक एस.टी. जगदाळे तपास करीत आहेत. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
