पुणे: आर्थिक वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. कोंढव्यातील पारशी मैदान परिसरात ही घटना नुकतीच घडली होती. अभय जगन्नाथ कदम (वय २४ रा. कोंढवा गावठाण), बादल श्याम शेरकर (वय २४, रा. बधे चाळ, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सुभाष रघुवीर परदेशी (वय ५२, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी हेमलता परदेशी (वय ४५) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभय कदम आणि सुभाष परदेशी यांच्यात आर्थिक कारणावरून वाद होते. आरोपी कदम आणि शेरकर यांनी परदेशी यांना कोंढव्यातील ज्योती हाॅटेलजवळील मैदानात बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी परदेशी यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.