जगातील काही देशांमध्ये वाढत असलेली करोना रुग्णांची संख्या चिंतेची बाब ठरत असली, तरी गेल्या आठवड्यापासून पुणे शहर आणि जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या दीर्घकाळ नियंत्रणात म्हणजे साधारण १० ते १५ च्या घरात राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मुखपट्टीचा वापर आणि प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीवर भर देण्याचे आवाहन शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार राज्यात ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील शनिवारची रुग्णसंख्या आठ एवढी नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे-सोलापूर महामार्गावर मोटार टँकरवर आदळून अपघात

शहरात मोठ्या संख्येने लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झालेले असल्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता अत्यल्प असल्याचे तज्ज्ञांकडून नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, चीन आणि अमेरिकेसह इतर देशांमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तनाचा बीएफ.७ हा उपप्रकार रुग्णवाढीस कारणीभूत ठरत असताना पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्येकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, सद्यस्थितीत रुग्णसंख्या नियंत्रित असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा- आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वत: कधी…”

बीएफ.७ सौम्यच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, की बीए.७ च्या प्रसाराचा वेग ओमायक्रॉनच्या मूळ रुपापेक्षा अधिक आहे. ओमायक्रॉनमुळे पाच जणांना होणारा संसर्ग बीएफ.७ मुळे १८ जणांना होतो. मात्र, या पलीकडे जाऊन तो अत्यंत सौम्य आहे. रुग्ण पाच दिवस किंवा त्यापेक्षा कमी काळात बरे होत आहेत. पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेसारखा हाहाकार माजण्याची शक्यता नाही. मुखपट्टीचा वापर आणि वर्धक मात्रा हे पुरेसे उपयुक्त ठरेल, असेही डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे.