पुणे: रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-दौंड मार्गावर आणि पुणे स्थानकात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवून एकाच दिवसात १ हजार ३१७ विनातिकीट प्रवासी पकडले. त्यांच्याकडून ११ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांची तपासणी नियमितपणे केली जाते. याचबरोबर एखाद्या मार्गावर अचानक विशेष तपासणी मोहीम राबविली जाते. रेल्वेने २० ऑक्टोबरला पुणे – दौंड मार्गावर विविध प्रवासी गाड्यांमध्ये आणि पुणे स्थानकात ही मोहीम राबविली. त्यात ६४ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेत १ हजार ३१७ विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले. त्यांच्याकडून ११ लाख ३८ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा… ‘पीएमसी केअर’चा पुणेरी कारभार; छोटा दगड काढून, ठेवला मोठा दगड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या संयोजनात व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अशा प्रकारची तिकीट तपासणी भविष्यातही नियमितपणे केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.