पुणे: आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार केल्याचे उघडकीस आले आहे. लष्कर भागात शनिवारी रात्री सराफ व्यावसायिकावर दोघांनी कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. आईचा अपमान केल्याने सराफावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

युवराज अनिल गोरखे (वय २४, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साथीदार सार्थक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय विमलचंद मेहता (वय ३८, रा. कुमार कॅसल सोसायटी, काॅन्व्हेंट स्ट्रीट, लष्कर) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. याबाबत मेहता यांचा भाऊ मनोज (३९) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… एनएमएमएसएस शिष्यवृत्ती अर्जांसाठी मुदतवाढ; ३१ डिसेंबरपर्यंत संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरखे याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची आई मेहता यांच्याकडे कामाला होती. विजय आणि गोरखेची आई यांच्यात वाद झाला होता. विजय यांनी आईवर चोरीचा आरोप केला होता. आईचा अपमान केल्याने गोरखे चिडला होता. शनिवारी (२ डिसेंबर) रात्री सव्वानऊच्या सुमारास विजय यांना आरोपींनी लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात अडवले. गोरखे आणि साथीदाराने त्यांच्यावर कोयता उगारला. विजय घाबरून पळाले. आरोपींनी पाठलाग करुन त्यांच्याव कोयत्याने वार केले. या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली होती.

हेही वाचा… पुण्यात पैशांचा पाऊस पाडणारा भोंदूबाबा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पसार झालेल्या गोरखेला पोलिसांनी अटक केली. आईचा अपमान केल्याने त्याने विजय यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके तपास करत आहेत.