पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलमध्ये १ एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय झाला. या पाठोपाठ आता जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील टोलमध्येही १८ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तीन वर्षांची ही एकत्रित वाढ करण्याचा हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास आणखी महागणार आहे. याचबरोबर आधीच इंधन दरवाढीमुळे जेरीस आलेल्या वाहनचालकांना आता वाढीव टोलचा भुर्दंड बसणार आहे.

हेही वाचा – पुणे: ससून रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीची आत्महत्या; नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाढीव टोलदर १ एप्रिलपासून लागू होणार आहे. याच महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्याच्या विरोधात १४ मार्चला स्थानिक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सरकारने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर दोनच आठवड्यांत सरकारने टोलवाढीचा निर्णय घेतला आहे. केवळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरच नव्हे, तर जुन्या महामार्गावरील प्रवासही महागणार आहे.

हेही वाचा – पुणे: विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने तरुणीची आत्महत्या; ‘एनडीए’तील जवानाविरुद्ध गुन्हा


जुना पुणे-मुंबई महामार्ग टोलचा दर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
वाहन जुना टोलनवीन टोल
मोटार१३५१५६
हलके वाहन२४०२७७
मालमोटार/बस ४७६५५१
अवजड वाहन १०२३११८४

स्थानिक नागरिकांसाठी टोलचा दर

वाहन जुना टोल नवीन टोल
मोटार ४१४७
हलके वाहन७२८३
मालमोटार/बस१४३ १६५
अवजड वाहन ३०७३५५