लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या सदनिकेतून दागिने, रोकड असा नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मगरपट्टा भागात घडली. याप्रकरणी कामगाराला हडपसर पोलिसांनी अटक केली.

सुनील सुदाम जगताप (वय ४८, रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार निवृत्त न्यायाधीश आहेत. तक्रारदारांची शुश्रृषा करण्यासाठी जगताप याला कामावर ठेवण्यात आले होते. जगतापने कपाटातून वेळोवेळी सोने-चांदीचे दागिने, रोकड, कागदपत्रे असा नऊ लाखांचा ऐवज लांबविला.

आणखी वाचा- माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन, शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या जगतापला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने मुलीच्या शिक्षणासाठी न्यायाधीशांच्या सदनिकेतून ऐवज चोरून नेल्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत.