scorecardresearch

Premium

पुणे: चोरी, घरफोडी, लुटमारीच्या ५३ गुन्ह्यांतील फरारी चोरटा अखेर जेरबंद

चोरी, घरफोडी, लुटमारीच्या ५३ गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोरेगाव भीमा परिसरातून अटक केली.

thief in 53 cases of theft
नानावतविरुद्ध राज्याच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी, चोरी, लूटमार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहर, तसेच ग्रामीण भागात चोरी, घरफोडी, लुटमारीच्या ५३ गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोरेगाव भीमा परिसरातून अटक केली.

Koyta gang in police trap
पुणे : ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमुळे कोयता गॅंग पोलिसांच्या जाळ्यात
Director General of Police Rashmi Shukla warns Naxalites in Gadchiroli
‘‘नागरिकांच्या सहकार्यानेच नक्षलवाद संपवू,” नक्षल्यांच्या गडातून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा इशारा…
Illegal parking of two-wheelers in two rows on Phadke Road
डोंबिवली : वर्दळीच्या फडके रोडवर दोन रांगांमध्ये दुचाकींचे बेकायदा वाहनतळ
traffic
शहरबात: दापचरी सीमा तपासणी नाक्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण

अरमान प्रल्हाद नानावत ( वय२४, रा. वढू खुर्द, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नानावतविरुद्ध राज्याच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी, चोरी, लूटमार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हा केल्यानंतर तो गुजरात, राजस्थान,मध्यप्रदेश या राज्यांमध्ये वास्तव्य करून पोलिसांना गुंगारा देत होता.

आणखी वाचा-पुणे रेल्वे स्थानकाला लवकरच पर्याय! हडपसर रेल्वे टर्मिनल उभारणीला गती

परराज्यांमधील पोलिसांच्या मदतीनेही नानावतचा शोध घेण्यात येत होता. पुणे जिल्ह्यात त्याचा वावर असल्याची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे ,पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, हनुमंत पासलकर, शब्बीर पठाण, विजय कांचन, राजु मोमीन, अतुल डेरे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, निलेश सुपेकर, प्रमोद नवले, दगडू वीरकर आदींचे गेल्या १३ दिवसांपासून त्याच्या मागावर होते. साध्या वेशाताील पोलिसांची पथके नानावत वास्तव्यास असलेल्या भागात तैनात करण्यात आली होती. नानावत कोरेगाव भीमा परिसरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तपासासाठी त्याला येत्या १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

आणखी वाचा-विमानतळावरील रांगेतून आता सुटका! पुण्यासह चार ठिकाणी लवकरच ‘फुल बॉडी स्कॅनर’

नानावतला पकडण्याचे आव्हान

नानावत याच्याकडून हिंजवडी, सांगवी, तळेगाव दाभाडे, पौड, घोडेगाव, वडगाव मावळ, कामशेत, दिघी आणि शिक्रापूर परिसरातील चोरी, लुटमारीचे ५३ गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले आहेत. नानावत गुन्हे करुन परराज्यात पसार व्हायचा. नानावतला पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thief in 53 cases of theft burglary and robbery was finally arrested pune print news rbk 25 mrj

First published on: 16-09-2023 at 11:12 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×