गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवार पेठ आणि पुणे स्थानक परिसरात कारवाई करत अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ७६ हजार रुपये किंमतीच्या ३८ ग्रॅम मॅस्केलाईन अंमली पदार्थाच्या गोळ्या तसेच दोन लाख रुपये किंमतीचे १० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडला १५ नोव्हेंबरपासून महिनाभर क्रीडा स्पर्धांचे आयोजन;  ४९ क्रीडा प्रकारांचा समावेश

अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी, कर्मचारी गस्तीवर होते. बुधवार पेठेतील क्रांती चौक, मगर गल्ली येथे जाहिदुल मोतेहर मलीक ऊर्फ आकाश मंडल (वय. २४,रा. भोई गल्ली बुधवार पेठ) हा अंमली पदार्थाच्या गोळ्या विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे अंमली पदार्थाच्या गोळ्या सापडल्या. त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे: पाच लाखांच्या कर्जावर दररोज १५ हजारांचा दंड; खंडणी विरोधी पथकाकडून सावकारावर कारवाई

बंडगार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे रेल्वे स्थानकाजवळ दोन व्यक्ती दुचाकीवरून आल्या असून, त्या अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार अलफाहाद वजीर सय्यद (वय २७, रा. सेन्ट्रल स्ट्रिट कॅम्प), शहारुख बाबु शेख (वय २९, रा. एमआयबीएम रस्ता, कोंढवा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, दोन लाख रुपये किंमतीचे एमडी, दुचाकी, मोबाइल असा २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे: आठ वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक चाळे करणारा अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक एस.डी. नरके, कर्मचारी नितीन जगदाळे, साहिल शेख, आझीम शेख, संतोष देशपांडे, दिशा खेवलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.