झाडांची बेकायदा कत्तल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.संजीव प्रल्हाद राक्षे, मच्छिंद्र नामदेव कडाळे, भरत रामभाऊ पारखी अशी या तिघांची नावे आहेत. त्यांनी परवानगीशिवाय झाडांची कत्तल केल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा >>>पुणे: शाळांचा दहावी-बारावीचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार; ७५ दिवसांचा कृती कार्यक्रम
या तिघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता निगडीतील सावरकर उद्यान; तसेच चिंचवडच्या दत्तनगर उद्यानातील झाडे तोडली. तसेच काही झाडांच्या फांद्याही तोडल्या. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी हे कृत्य केल्याची बाब सकृतदर्शनी निदर्शनास आली आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे आदेश दिल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.