पिंपरी : जेवण झाल्यानंतर शतपावली करणाऱ्या तीन महिलांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री चऱ्होली बुद्रुक बाजारपेठ येथे घडली. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांची आई आणि मावशी असे सायंकाळी जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर फेऱ्या मारत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या मावशीला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता इतर आरोपींनी फिर्यादी, त्यांची आई आणि मावशीला स्टीलचा पाइप आणि सिमेंट गट्टूने मारहाण केली.