पुणे : विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय ज्ञान, विज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘भारतीय ज्ञानप्रणाली’वर पदवीत्त्युर पदवी अभ्यासक्रमाची सुरूवात केली आहे.विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे ‘एमए इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. केंद्राच्या विभागप्रमुख डॉ. मंजिरी भालेराव यांनी ही माहिती दिली.

मराठी माध्यमातून चालणारा भारतीय ज्ञान प्रणालीवरील हा राज्यातील पहिलाच अभ्यासक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चालू शैक्षणिक वर्षापासूनच (२०२५-२६) या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी हा दोन वर्षांचा असून, तो चार सत्रात ‘हायब्रिड’ पद्धतीने राबवला जाणार आहे. त्यात आठवड्यातील दोन दिवस ऑनलाईन पद्धतीने, तर शनिवार, रविवारी सदाशिव पेठेतील संकुलात तासिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवाराला अर्ज करता येणार आहे, असे भालेराव यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौदा विद्या, चौसष्ट कला, भारतीय न्यायव्यवस्था, कौटिल्याचे अर्थशास्त्र, साहित्याचा इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, कृषी-सिंचन, धातूविद्या, दृश्यकला, योग आणि आयुर्वेद, शिल्पकला, मूर्तिशास्त्र, इत्यादी विषयांचा समावेश भारतीय ज्ञानप्रणालीच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देशाच्या समृद्ध वारशाची ओळख करून घेता येईल. डॉ. मंजिरी भालेराव विभागप्रमुख, श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्र