पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार कुटुबियांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध आहे. त्यामुळे आता निवडणुकीतून माघार नाही. येत्या १२ एप्रिल रोजी निवडणुकीचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

हेही वाचा – “त्यांच्याकडे पहिलवान असले, तर आमच्याकडे..”, रवींद्र धंगेकर यांचा मोहोळ यांना टोला; शरद पवारांची घेतली भेट

हेही वाचा – गिरीश बापट, मुरलीधर मोहोळ यांची तुलनाच होऊ शकत नाही; रवींद्र धंगेकर यांची टीका

महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली जाणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. बारामती कोणाचा सातबारा नाही, असे सांगत शिवतारे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना समज दिल्यानंतरही ते या भूमिकेवर ठाम असून, त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेटही घेतली होती. सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पराभव होईल, असा दावाही शिवतारे यांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या चिन्हावरही निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. या पार्श्वभूमवीर शिवतारे यांनी रविवारी त्यांची भूमिका जाहीर करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधी भूमिका घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली.