लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: खडकी येथील दोन भुयारी मार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिका रेल्वे प्रशासनाला पंचवीस कोटींचा निधी देणार आहे. रूंदीकरणामुळे खडकी भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी यांची महापालिकेत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

आणखी वाचा-आता काँग्रेसचा मावळवर दावा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेने स्वखर्चाने ही कामे करण्याची तयारी दर्शविली आहे. खडकी येथे सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गालगत रेल्वे मार्ग आहे. रेल्वे मार्गातील भुयारी मार्गामुळे औंध, बोपोडी, खडकी आणि येरवडा भागातील वाहनचालकांना ये-जा करणे सुलभ होत आहे. मात्र भुयारी मार्गाची रूंदी कमी असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे खडकी पोलीस स्थानक ते खडकी सहाय्यक पोलीस कार्यालयाजवळील भुयारी मार्गांचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका रेल्वे प्रसासनाला पंचवीस कोटींचा निधी देणार आहे. भुयारी मार्गालगतच्या स्वतंत्र रस्त्याचेही रूंदीकरण महापालिकेकडून करण्यात येणार असून त्यासाठी पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या रस्त्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जागा दिली जाणार आहे.