पुणे : गणेशोत्सव खरेदीसाठी मध्यभागात शनिवारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. खरेदीसाठी शहर, तसेच उपनगरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने मध्यभागातील रस्त्यावर वाहने आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी भर पडली.

गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला असून मंडई, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी, तुळशीबाग परिसरात शनिवारी सकाळपासून गर्दी झाली होती. शनिवारी आणि रविवारी सुट्या असल्याने नागरिकांनी सहकुटुंब खरेदीसाठी गर्दी केली होती. मंडई, तुळशीबाग, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी कोंडीतून वाट काढत खरेदी केली. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हे ही वाचा… पुणे : समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

सुट्टी असल्याने अनेकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद घेतला. अनेकजण मोटारीतून मध्यभागात खरेदीसाठी आले होते. मध्यभागातील मंडई, नारायण पेठ परिसरात वाहनतळावर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने या भागात मोटारींच्या रांगा लागल्या होत्या. मध्यभागाासह उपनगरातील बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोथरुड, कर्वेनगर, वारजे, हडपसर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, कोंढवा, वानवडी या भागातील बाजारपेठेत गर्दी झाली होती. खरेदीसाठी आठवडाभर राहिल्याने अनेकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद लुटला.

उपनगरातील नागरिक गणेशोत्सवात आवर्जुन मध्यभागातील मंडई परिसरात खरेदीसाठी येतात. मध्यभागातील गल्ली बोळात बेशिस्तपणे वाहने लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

हे ही वाचा… पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यभागात वाहतूक नियोजनासाठी बंदोबस्त

मंडई ते शनिपार परिसरात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमामावर गर्दी करतात. गर्दीचे नियोजन करण्यासाठी या भागात वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रातील रस्त्यावर मोटारी लावाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. —