पुणे : समतेच्या पायावर समाजाची निर्मिती करण्यासाठी धडपडणाऱ्यांना पाठबळ देऊन खऱ्या अर्थाने ‘लोकराजा’ ठरलेल्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शहरातील विविध संस्था संघटनांकडून अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, संजय गाडे, संतोष कपटकर, गणेश ठोंबरे, जावेद शेख, विनोद धवडे या वेळी उपस्थित होते. ‘एकता सेवा प्रतिष्ठान’च्या वतीने ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल शाळे’च्या आवारातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नजीर शेख, सचिन खंडागळे, तन्मय देशपांडे, महेश साळुंखे, शाहनवाज पिंजारी या वेळी उपस्थित होते.

दलित सेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुनील यादव, वसंत बोले, काळूराम ससाणे, शशिकांत शेलार, प्रदीप गायकवाड, शशिकांत कांबळे या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जुबेर मेमन, फरीद खान, फरहीन खान, फरहीन सय्यद, वंदना कांबळे या वेळी उपस्थित होत्या.

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष भगवानराव वैराट, काशिनाथ गायकवाड, महंमद शेख, दत्ता कांबळे, सुरेखा भालेराव, प्रदीप पवार या वेळी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, प्रमिला गायकवाड, डॉ. विलास पाटील, अजय पाटील, वासंती बोर्डे या वेळी उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेच्या चंद्रभागा बाबूराव तुपे साधना कन्या विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. उर्मिला पाटील, आनंद करे, मंदाकिनी शिंदे, पौर्णिमा सावंत, लालासाहेब खलाटे, तुकाराम डोंगरे, मनीषा सुतार, शीतल शिंदे या वेळी उपस्थित होत्या. प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शशिकला कुंभार, वर्षाराणी कुंभार, राजेंद्र कुंभार या वेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनसंघर्ष समितीच्या वतीने संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. समितीच्या वतीने व्यसनमुक्तीपर पथनाट्य सादर करण्यात आले. आप्पासाहेब यादव, कर्नल संग्रामसिंह यादव, विकास देशपांडे, ॲड. मोहन वाडेकर, ॲड. रवींद्र रणसिंग, संतोष पवार, पृथ्वीराज काकडे या वेळी उपस्थित होते.