शनिशिंगणापूरमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण झाल्यानंतर भूमाता महिला रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना सोमवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तृप्ती देसाई यांच्या पोटात आणि छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.
शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी आलेल्या तृप्ती देसाई व त्यांना समर्थन देणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना शनिवारी मारहाण करण्यात आली. पोलिसांचा ढिसाळपणा व गावकऱ्यांच्या विरोधामुळे त्यांना चौथऱ्यावरून दर्शन न घेताच परत जावे लागले होते. त्यामुळे संस्थान परिसरात काही वेळ तणाव, घोषणाबाजी, पळापळही झाली.
तृप्ती देसाई या दुपारी तीन वाजता सहकारी महिलांसह आल्या. मुरकुटे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत मुरकुटे यांच्यासह त्या शनिमूर्तीकडे गेल्या. त्यांनी चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षारक्षक व पोलिसांनी चौथऱ्यावर जाऊ दिले नाही. देसाई आल्यानंतर गावकरी व शनिभक्त मोठय़ा संख्येने जमले. या वेळी तृप्ती देसाई व मुरकुटे यांना पुन्हा जमावातील काहींनी मारहाण केली. नंतर पोलीस त्यांना मोटारीत बसवून नगरच्या दिशेने घेऊन गेले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2016 रोजी प्रकाशित
तृप्ती देसाई रुग्णालयात, मारहाणीनंतर छातीत दुखत असल्याची तक्रार
प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 04-04-2016 at 12:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trupti desai admitted in hospital at pune