कोंढवा भागातील चार मजली इमारतीचा एकाच वर्षात तब्बल वीस वेळा व्यवहार करण्यात आला आहे. आरोपींनी इमारतीची कागदपत्रे तारण ठेवून बँकेकडून कर्ज काढण्यात आले. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी पाच महिलांसह सहा जणांना अटक केली.इमारत विक्रीचे व्यवहार होत असताना मूळ मालकांना याबाबतची माहिती देखील नव्हती. संबंधित मालमत्ता तीन वेळा बँकांकडे गहाण ठेवून त्यावर सुमारे तीन कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचे आढळून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शाळा प्रवेशाचा घसरता टक्का २०२५ पर्यंत कायम ; ‘एनसीईआरटी’च्या अहवालातील अंदाज

अंजली सत्यदेव गुप्ता, नीरू अनिल गुप्ता, किरण देवेंद्र चढ्ढा आणि सुमन अशोक खंडागळे यांनी कोंढवा खुर्द येथील जमीन विकत घेतली होती. २००५ मध्ये त्यांनी चार मजली नंदनवन नावाची इमारत बांधली. गुप्ता, चढ्ढा, खंडागळे कुटुंबीय प्रत्येक मजल्यावर राहत होते. काही कारणांमुळे २०२० मध्ये या इमारकीची विक्री करण्याचे ठरविण्यात आले. त्यांनी विनय पाटील आणि जमीन खरेदी- विक्री करणाऱ्या दलालांना याबातची माहिती दिली. त्यासाठी त्यांनी मालमत्तेचे खरेदी खत आणि कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. मे २०२१ पासून ही इमारत पाहण्यासाठी खरेदीदार येऊ लागले; तसेच मूल्यांकनासाठी बँकांचे अधिकारीही येत होते. तुमची इमारत जुनी आहे. परिसर चांगला नाही. यामुळे खूप लोकांना जागा दाखवावी लागते, अशी बतावणी पाटील याने केली होती.

हेही वाचा >>> फॉक्सकॉनवरून राज्याची दिशाभूल करू नका : पवार

नोव्हेंबर २०२१ मध्ये एका व्यक्तीशी इमारत विक्रीचा तीन कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार ठरला. त्यानंतर कर्ज मंजूर होत नसल्याचे व्यवहार पूर्ण झाला नाही. ४ ऑगस्ट २०२२ रोजी कॉसमॉस बँकेच्या अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता कोणाला विकली आहे का, अशी विचारणा महिलांकडे केली.
दरम्यान, विनय पाटील याने अन्य महिलांशी संगनमत करुन हवेली उपनिबंधक कार्यालयात इमारतीच्या मालक महिलांची बनावट कागदपत्र तयार करून फेब्रुवारी महिन्यात दस्तनोंदणी केली होती. त्याच महिलांना घेऊन पुन्हा त्याच मालमत्तेचे नवीन दस्त नोंदणीसाठी ते आले होते. या प्रकारामुळे उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी तपासणी केल्यानंतर एकाच प्रकारे सर्व्हे क्रमांकात बदल करून वर्षभरात वीसहून अधिक व्यवहार झाल्याचे आढळून आले.

संबंधित मालमत्ता तीन वेळा बँकांकडे गहाण ठेवून त्यावर सुमारे तीन कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचे आढळून आले. त्यानंतर उपनिबंधकांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मूळ मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या सर्व प्रकारात त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपास करून पाच महिलांसह विनय पाटील याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twenty times transaction of the building in one year by the accused pune print news amy
First published on: 16-09-2022 at 09:42 IST