scorecardresearch

पुण्यात राजेंद्रनगरमध्ये दोन गटात हाणामारी; १४ जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आलेल्या आहेत.

crime
(फाईल फोटो)

वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना पुण्यात नवी पेठेतील राजेंद्रनगर परिसरात घडली. या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्रनगरमधील महापालिकेच्या वाचनालयाजवळ अभिजीत संजय गव्हाणे (वय २५,रा. विवेकश्री अपार्टमेंट, राजेंद्रनगर) याला टोळक्याने वैमनस्यातून मारहाण केली. तसेच, भांडणात मध्यस्थी करणारे शीतल शिंदे यांना टोळक्याने वीट फेकून मारली आणि गव्हाणे याच्या दुचाकीची तोडफोड देखील करण्यात आली. गव्हाणे याने याबाबत फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार विकी रणदिवे, शुभम सकट, सचिन मोहिते, ओंकार ननावरे, रामा लोखंडे, शंकर पाटील, आशुतोष जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हाणामारी प्रकरणात सचिन निवृत्ती मोहिते (वय ३०) याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मुजाहिद नजीम शेख, अभिजीत गव्हाणे, अजित तुपेरे, सुफियान शेख, राहुल शिंदे, अनिल तुपेरे, राहुल खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन मोहिते हा राजेंद्रनगर परिसरात मित्रांशी गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी दुचाकीवरुन तेथे आले आणि त्यांनी मोहितेला धमकावले. तसेच मोहिते आणि त्याच्या मित्राला मारहाण देखील केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two groups clash in rajendranagar pune charges filed against 14 persons pune print news msr

ताज्या बातम्या