लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कोंढव्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

कोंढव्यातील लक्ष्मीनगर परिसरात शाळेचे बांधकाम सुरू आहे. तेथे काम करणारे दोन सुरक्षारक्षक सोमवारी रात्री पाकिस्तान जिंदाबादच्या घाेषणा देत होते. तेथून निघालेल्या काही नागिरकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ऐकल्या. त्यांनी या घटनेची माहिती त्वरित कोंढवा पोलिसांना दिली. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… धक्कादायक: पिंपरी चिंचवडमध्ये ब्लेडने वार करून मित्राची हत्या; गुप्तांग कापून मृतदेह विहिरीत फेकला

कोंढवा भागातून दहशतवाद्यांना राज्य दहशतवाद विराेधी पथक (एटीएस), तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आयसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार करणाऱ्या दहशतवाद्यांना अटक केली होती. देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याची माहिती तपासात उघडकीस आली होती.