महाराष्ट्रामधून वेदान्त – फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे.या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपा दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेमार्फत ठिकठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे, ‘उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा’ असे फ्लेक्स लावले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2022 रोजी प्रकाशित
पुण्यात शिंदे गटाकडून बॅनरबाजी, ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ म्हणत उद्धव ठाकरेंना लक्ष्य
महाराष्ट्रामधून वेदान्त - फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 30-10-2022 at 22:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray attention from shinde group in flex in pune svk