पुणे: जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागातील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून १७ मे २०२५ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पळून गेले होते. तर पती शशांक सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील पती आणि सासरे यांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पुणे जिल्ह्यातील अनेक भागात टीम रवाना केल्या होत्या. त्याच दरम्यान काल पहाटेच्या सुमारास सासरे रविंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना स्वारगेट येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केले असता, दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तर वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर त्यांचे ९ महिन्यांचे बाळ हगवणे कुटुंबियांच्या घरी आढळून आले नाही. हे बाळ कुठे गेले आणि कोणाकडे असेल याचा शोध पोलीस आणि वैष्णवी हगवणे यांचे कुटुंबिय घेऊन लागले. त्याच दरम्यान वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे यांचे मित्र निलेश चव्हाण यांच्याकडे माहीती मिळाली. त्यानंतर वैष्णवी यांचे कुटुंबिय निलेश चव्हाण यांच्याकडे बाळ मागण्यांसाठी गेले. त्यावेळी निलेश चव्हाण याने बंदुकीचा धाक दाखवून बाळ देण्यास नकार दिला. त्यानंतर या प्रकरणी बंदुकीचा धाक दाखविल्या प्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर निलेश चव्हाण या आरोपीविरोधात अनेक प्रकरणं समोर आली. त्याच दरम्यान पुणे पोलिसांनी निलेश चव्हाण यांच्या घराची झडती घेतली.

त्याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचे बाळ निलेश चव्हाण यांच्याकडे असल्याची माहीती समोर आली. निलेश चव्हाण यांनी बंदुकीचा धाक दाखवून ते बाळ देण्यास नकार दिला. त्या प्रकरणी निलेश चव्हाण या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या आरोपीचा शोध सुरू आहे. त्या दृष्टीने आरोपीच्या घरची झडती घेण्यात आली. त्या ठिकाणी लॅपटॉपसह अन्य काही वस्तु सापडल्या आहेत. त्या वस्तू आमच्या ताब्यात असून आमचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ते पुढे म्हणाले, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील शशांक हगवणे, सुशील हगवणे या दोघांकडे पिस्तूल आहे. तसेच पिस्तूलचा धाक दाखवून बाळ देण्यास नकार देणारा आरोपी निलेश चव्हाण या तिघांचा पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.