आपले व्यक्तिमत्त्व विसरुन नाटक किंवा चित्रपटामध्ये आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेमध्ये रंग भरण्याचे काम अभिनेते करतात. अन्य व्यवसायप्रमाणे अभिनेत्याला शपथ घ्यावी लागत नाही. त्यामुळे कलाकार हे मूलतः व्यावसायिक खोटारडे असतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी रविवारी व्यक्त केले. कन्नड, तेलगू, पंजाबी भाषेतील चित्रपटांबरोबरच इटालियन कार्यक्रमाचे काम सुरू आहे. संधी दिली तर मला मराठीमध्ये काम करायला आवडेल, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली.
हेही वाचा >>>पुणे: दुर्मीळ मेंदुविकाराने ग्रासलेल्या मुलाला जीवदान; मेंदुविकार तज्ज्ञांना यश
मंजूल प्रकाशनच्या वतीने कबीर बेदी लिखित ‘स्टोरीज आय मस्ट टेल’ या पुस्तकाच्या मराठी अनुवाद प्रकाशननिमित्त प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी बेदी यांच्याशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रत्येकाला साहसी जीवन जगण्याची इच्छा असते. पण, त्यासाठी किंमत मोजण्याचे धाडस प्रत्येकाकडे नसते. जे जीवन जगलो ते पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केले, असे त्यांनी सांगितले. सचिन कोळी यांनी प्रास्ताविक केले.भारत, अमेरिका आणि इटलीसह अन्य युरोपीय देशांमध्ये रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा माध्यमांमध्ये काम केल्यामुळे प्रसिद्धी मिळाली. मी लोकप्रिय असलो तरी माझी कथा कोणाला माहीत नाही. ही आत्मकथा या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे. इंग्लंड, फ्रान्स, इटली या देशांपेक्षा मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे पुस्तक मराठीत येत आहे याचा आनंद आहे, अशी भावना बेदी यांनी व्यक्त केली. चित्रपट, दूरचित्रवाणी, व्हिडीओ, डीव्हीडी आणि इंटरनेट असे तंत्रज्ञानाने जगात बदल केले आहेत. त्याचा मी साक्षीदार आहे. ओटीटी व्यासपीठामुळे चित्रपट पाहण्यासाठी आता चित्रपटगृहात जावे लागत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा >>>पुणे: कोथरूड पोलिसांकडून एक लाखांचे मॅफेड्रॉन जप्त
बेदी म्हणाले, रुबाबदार व्यक्तिमत्त्व असण्याचे फायदे झाले तसे तोटेही झाले. अनेक चांगल्या भूमिका करता आल्या नाहीत. जाहिरात क्षेत्रात काम केल्याने लेखनाची सवय असली तरी लेखक नव्हतो. केवळ आनंद मिळवण्यासाठी लेखन करायचो. रंगभूमी, चित्रपटातील काम आणि लेखन, मला सगळ्या भूमिका आवडतात. त्या सगळ्यांनी मला भरपूर आनंद दिला आहे. दहा वर्षांचा विचार आणि करोना टाळेबंदी काळातील दीड वर्षांचे लेखन यातून हे पुस्तक साकारले.
कबीर बेदी म्हणाले….
होनोलुलु येथे मी काम करत होतो. राकेश रोशनने दूरध्वनी करून तुला ‘खून भरी मांग’ चित्रपटामध्ये भूमिका करायची आहे असे सांगितले. त्या वेळी आघाडीची कलाकार असलेल्या रेखासमवेत काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी नायक आणि खलनायक अशी दुहेरी छटा असलेली भूमिका साकारली.
हेही वाचा >>>विजय तेंडुलकर लिखित ‘गिधाडे’च्या हिंदी रूपुणे: एमपीएससीतील सदस्यांअभावी स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतींना फटका
पांतरासाठी अलेक पदमसी यांनी आणि गिरीश कर्नाड यांच्या ‘तुघलक’ नाटकातील भूमिकेसाठी मी रंगमंचावर काम केले आहे. अभिनेता म्हणून माझ्या घडणीमध्ये पदमसी आणि कर्नाड कारणीभूत आहेत.
देशाच्या घडणीमध्ये टाटा परिवाराचे योगदान या विषयावर ‘कीपर्स ऑफ द फ्लेम’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती. जमशेटजी टाटा आणि जे. आर. डी. टाटा यांच्या योगदानावर आधारित या लघुपटामध्ये मला भू्मिका साकारण्याची संधी लाभली.
मी महिलांचा आदर करतो. तीन घटस्फोट झाले असले तरी मी प्रत्येक पत्नीचा चांगला मित्र आहे. त्या तिघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.