पुणे : ‘आई, जबरदस्तच आहे, लई मोठा वाघ आहे आबाच्या उसापाशी’ अशा शब्दांत वर्णन करीत ओतूर (ता. जुन्नर) येथील शेतामध्ये मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचे चित्रीकरण प्रसारित झाले आहे.

जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे. एका घराच्या जवळच असलेल्या शेतात हा बिबट्या आढळला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा मुक्त संचार कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसृत झाला आहे.

हेही वाचा – ठाणे – बोरिवलीदरम्यान बेस्ट प्रवाशांचे हाल, ठाणे – मागाठाणे बेस्ट बसचे तीन थांबे वगळले

हेही वाचा – Mumbai Rain Red Alert : मुंबईत सर्वाधिक पाऊस कुलाबामध्ये, चर्चगेट जलमय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओतूर परिसरात पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुविलास गाढवे यांचे घर आहे. त्यांच्या घराजवळ रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान हा बिबट्या आढळला. गाढवे यांच्या मुलाने गाडीतून या व्हिडीओ चित्रित केला आहे. बिबट्याचा वावर आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.