पुणे : दुष्ट प्रवृत्तींच्या संहारासाठी हिंसा आवश्यक आहे, असे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदूंचे सर्व देवी-देवताही हिंसक आहेत. हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक आहे. हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार आहे, असे मत कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी शनिवारी व्यक्त केले.

धर्मजागरण सभेच्या निमित्ताने कालीचरण महाराज पुण्यात आले होते. या सभेच्या आधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी धर्मजागरण सभेचे आयोजक शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे, पुणे शहर भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला उपस्थित होते. कालीचरण महाराज म्हणाले, ‘देशात काही ठिकाणी विशिष्ट समुदायातल्या युवकांवर जमावाने हिंसेच्या घटना घडत आहेत. या घटनांबद्दल मनात कोणतीही खंत नाही. हिंदू धर्माचे कार्यच दुष्टांचे निर्दालन करणे, हे आहे. अशा हिंसेचे मी समर्थन करतो.

हेही वाचा >>> “तीन राज्यांतील पराभवामुळे राहुल गांधी…”, अनुराग ठाकूर यांची टीका

जात, भाषा, प्रांत अशा वादांमध्ये अडकलेल्या हिंदू समाजाची मोट बांधून कट्टर हिंदू मतपेटी (व्होटबँक) बनविणे हा धर्मजागरण सभेचा उद्देश आहे. त्यात योगदान देणे हे साधुंचे कार्य आहे. समाजाचे हित साधणारा तो साधू, या न्यायाने मी माझे कार्य करीत आहे, असेही कालीचरण महाराज म्हणाले. ‘लव्ह जिहाद’ विरोधात हिंदूंनी संघटीत होणे गरजेचे आहे. मुस्लिम समाज संख्येने कमी असतो तोवर भाईचारा असल्याचे दिसते, त्यांची संख्या वाढल्यावर ते त्याच भाईला आपला चारा बनवतात. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी योगी आदित्यनाथ प्रभावी काम करत असून देशभरातल्या समस्त हिंदूंच्या संघटनांचे नेतृत्त्व करण्याची क्षमता त्यांच्या अंगी आहे. भविष्यात हिंदुस्थानात रामराज्य आणण्याचे स्वप्न ते साकार करू शकतात, असेही ते म्हणाले.