शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के रा‌खीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (६ जून) प्रवेश निश्चित करता येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा राज्यातील ९ हजार ८६ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. त्यातील ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झाला. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत जवळपास ६३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे अद्यापही २७ हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.