पिंपरी : देहू-आळंदी रस्त्यावर क्रेनच्या धडकेत एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास तळवडे येथे घडली.

नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदवे हे देहूवरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्तीजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलिसांनी त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

त्यांच्याजवळ असलेल्या मोबाइलवरून पोलिसांनी त्यांच्या मुलाशी मुंबई येथे संपर्क साधला आहे. पोलिसांनी आरोपी क्रेनचालक याला ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.