पुणे : मागील १५ दिवसांत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडीच्या या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा, रॅली, पदयात्रा पाहण्यास मिळाल्या. या संपूर्ण प्रचारादरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभा गाजल्या. प्रत्येक सभेत नवनवीन आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. त्या सर्व घडामोडींदरम्यान पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे आणि शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा – पुणे-सातारा रस्त्यावर टोळक्याची दहशत, वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार
प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष निष्ठा सोडली नाही . चेतन तुपेंने मात्र फुटीरांना साथ दिली. वडिल विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते ?’ हे त्यांनी शिकायला हवे होते .
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 18, 2024
याच मतदारसंघात अजित पवार यांनी चेतन तुपे यांच्यासाठी रोड शो घेतला, तर शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांच्यासाठी सभा घेतली. त्यामुळे हडपसरमधील जनता चेतन तुपे की प्रशांत जगताप यांच्या पाठीशी राहते. याकडे सर्वाचे लक्ष राहिले असताना आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शरद पवार यांनी सोशल मीडियावरील एक्स अकाउंटवर प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष निष्ठा सोडली नाही. चेतन तुपेने मात्र फुटीरांना साथ दिली. वडील विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते?’ हे त्यांनी शिकायला पाहिजे होते, अशा मजकुराचे ट्विट केले. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तसेच आजवर हडपसरमधील जनतेने एक वेळेस आमदार झालेल्या नेत्याला पुन्हा आमदार होण्याची संधी दिली नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रशांत जगताप की चेतन तुपे या दोघांपैकी कोणाच्या पाठीशी जनता उभी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.