पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यानुसार विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्याबरोबरच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची नाव चर्चेत आहे. खासदार अमोल कोल्हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून असल्याने दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत आल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चाही या बैठकीत करण्यात आली. त्यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही नाव पुढे आल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

हेही वाचा – पुणे: राज्यात १ जुलैपासून मिळणार नवीन लायसन्स; स्मार्ट कार्ड टंचाईवर सरकारचा निर्णय

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे आहेत. मात्र, कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असून त्यांची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबरची जवळीक वाढत आहे. त्यामुळे ते भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, डाॅ. कोल्हे भाजपामध्ये जाणार, या चर्चेमुळेच दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्र दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढविली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू अशी दिलीप वळसे पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कोणाला उमेदवारी देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is ncp candidate for shirur lok sabha pune print news apk 13 ssb
First published on: 01-06-2023 at 10:15 IST