महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

जयंत पाटील हे तळेगाव एमआयडीसी या ठिकाणी जनरल मोटर कामगारांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आले होते. तेव्हा, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

हेही वाचा – अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पुण्याबाहेर सोडणारा ‘डोके’ अटकेत, जाणून घ्या कोण आहे हा डोके?

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला जरी विचारलं की राष्ट्रवादी कोणाची, तर शरद पवारांची, असंच महाराष्ट्रातील नागरिक सांगतात. निवडणूक आयोगाने जर यात बदल केला तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करेल, असं मला वाटत नाही.

हेही वाचा – थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविल्यानंतर पुणे विमानतळ व्यवस्थापन अखेर हलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष हा नेमका अजित पवार यांचा की शरद पवार यांचा याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. याची सुनावणी आज केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. त्यापूर्वी अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे नेते मूळ राष्ट्रवादी आमचीच आहे, असा दावा करत आहेत. या कामगारांचे प्रश्न लवकरात- लवकर सोडवावे असे आवाहन ही त्यांनी सरकारला केले आहे.