पिंपरी- चिंचवड : पुण्याच्या मावळमध्ये इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवाहित महिलेला वन्यजीव रक्षक आणि ग्रामस्थांनी जीवनदान दिलं आहे. कौटुंबिक वादातून महिलेने हे टोकायच पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. महिलेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत.
मावळमधील इंदोरी पुलावरून इंद्रायणी नदीत २८ वर्षीय महिलेने जीव देण्याच्या उद्देशाने उडी घेतली. रहदारीचा रस्ता असल्याने तात्काळ तिथं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आणि मावळ वन्यजीव रक्षक सदस्यांनी मदत करत महिलेला मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेला वाचवण्यात आलं.
थोडा ही उशीर झाला असता तर महिलेच्या जीवाच बरवाईट झालं असत. रुग्णवाहिकेला तात्काळ बोलवून महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे. कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. महिलेच्या पतीने लाखोंचं कर्ज काढलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.