दुपारचे बारा वाजून गेल्यानंतरही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप संपण्याची चिन्हे नाहीत. लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, शास्त्री रस्ता येथेही मंडळांच्या रांगा आहेत. एकंदर स्थिती पाहता कमीत कमी पाच वाजून जातील असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त होत असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात नव्याने आलेल्या सरकारने यंदा विसर्जन मिरवणुकीवरील सर्व निर्बंध उठवल्यामुळे आणि गेली दोन वर्षे करोनामुळे गणेशोत्सवातील उत्साहावर विरजण पडल्याने यंदाची मिरवणूक जोमात आणि जोशात होणार, असा सर्वांचाच अंदाज होता. उत्सवाच्या काळातही कार्यकर्ते आणि भाविक यांचा उत्साह ओसंडून वाहाताना दिसून आला.

हेही वाचा : पुणे : विसर्जन मिरवणूक अद्यापही लांबलेलीच

विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करून लवकरता लवकर संपवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गणेश मंडळांना केले होते. मात्र त्याचा कोणत्हा परिणाम झालेला दिसून आला नाही. एकेक मंडळ दीर्घ काळ मार्गावर थांबून राहात असतानाही, पोलिसांनी कोणत्याही स्वरूपाची जबरदस्ती केली नाही आणि कारवाईचा बडगाही उचलला नाही. त्यामुळे मानाचे गणपती विसर्जित होण्यासच सुमारे अकरा तास लागले. त्यानंतरही विशेष आकर्षण असलेल्या दगडूशेठ आणि मंडई मंडळाच्यागणपतींना मिरवणुकीत सहभागी होण्यास दरवर्षीपेक्षा विलंब झाला. प्रचंड गर्दीतही टिळक चौकातून किमान सात रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत वेळेत पोचविण्यात आल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the immersion procession in pune set a record this year pune print news tmb 01
First published on: 10-09-2022 at 12:36 IST