पुणे: घरात गावठी दारुचा अड्डा चालविणाऱ्या महिलेला खडक पोलिसांनी अटक केली. भवानी पेठेती कासेवाडीत छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. राधा अनिल साेनवणे (वय ५०, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा सोनवणे ही कासेवाड परिसरात घर भाड्याने घेऊन राहत आहे. ती घरात गावठी दारू विक्रीचा अड्डा चालवित असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.

सोनवणेच्या घरातून ३५० लिटर गावठी दारू, चार हजार ३४० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा सोनवणेने घर भाडेतत्त्वावर घेतले होते. गावठी दारुची विक्री ती करत होती. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करत आहेत. ग्रामीण भागात गावठी दारु तयार करुन ती शहरात विक्रीस पाठविली जाते. शहरातील दाट वसाहतीत छुप्या पद्धतीने गावठी दारू विक्री केली जाते.