पुणे : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. सुषेण उर्फ सुशांत बाळासाहेब चव्हाण (वय २६, रा. हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अमोल संदीपान गायकवाड (वय ३४, रा. पांढरेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव), मयूर चव्हाण (रा. बीड) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत आणि अमोल मूळचे भूम तालुक्यातील पांढरेवाडीतील आहेत. दोघे शेजारी आहेत. सुशांतचे अमोलच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. दीड वर्षांपूर्वी सुशांत आणि अमोलची पत्नी पुण्यात पळून आले होते. दोघेजण हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात राहायला आहेत. सुशांत एका व्हिडीओ पार्लरमध्ये काम करतो.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस, सुमित मलिक आणि सुवेझ हक यांची उलटतपासणी घ्या; प्रकाश आंबेडकर यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी

हेही वाचा – पुणे : फलक काढताना विजेचा धक्का बसून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

सुशांत आणि पत्नी हडपसर भागात वास्तव्यास असून सुशांत व्हिडीओ पार्लरमध्ये काम करत असल्याची माहिती अमोलला मिळाली होती. अमोल आणि त्याचा मित्र मयूर पुण्यात आले. व्हिडीओ पार्लरमध्ये दोघेजण चेहरा झाकून शिरले. दोघांनी सुशांतवर कोयत्याने वार केले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करत आहेत.