02 July 2020

News Flash

आरोग्यदायी आहार : आवळा कँडी

उकळत्या पाण्यात आवळे टाकून पाच ते १० मिनिटे ठेवावे.

डॉ. सारिका सातव

साहित्य

* आवळे-एक किलो

*  साखर-साडेतीन कप

कृती :

*  आवळे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यावेत.

*  एका मोठय़ा पातेल्यात पाणी उकळत ठेवावे.

* उकळत्या पाण्यात आवळे टाकून पाच ते १० मिनिटे ठेवावे.

* गॅस बंद करून एका चाळणीत आवळे काढावेत.

* आता सुरीने आवळय़ाच्या फोडी सहजतेने होतात. बी काढून टाकावे.

* पूर्ण थंड झाल्यानंतर आवळय़ाचे तुकडे आणि तीन कप साखर मिसळून ठेवून द्यावे.

* अधूनमधून हलवत राहावे.

* दोन ते तीन दिवसांनंतर आवळय़ाचे तुकडे जेव्हा भांडय़ाच्या तळाशी बसतात, तेव्हा काढून घेऊन चाळणीत घ्यावे.

* द्रव सगळा निथळून गेल्यानंतर उन्हात वाळवावे.

* पिठीसाखर चाळून पूर्णत: वाळवावे.

नंतर हवाबंद डब्यात भरावेत.

वैशिष्टय़े

*  ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात.

*  रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

*  त्वचा, केस, पचनशक्ती, डोळे यांच्यासाठी अतिशय उपयुक्त.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2019 2:48 am

Web Title: amla candy recipe zws 70
Next Stories
1 ‘एसयूव्ही’ कारचे वर्ष..
2 इतिहासातील ‘उद्याची मोटार’
3 आधुनिक प्रयोगातून ‘ऑर्किड’ची लागवड
Just Now!
X