नीलेश लिमये nilesh@chefneel.com

साहित्य

ब्रेड, २ वाटय़ा दूध, २ अंडी, लोणी, पिठीसाखर, दालचिनी पूड

कृती –  ब्रेडच्या कडा काढून टाकून त्याचे त्रिकोणी तुकडे करून घ्या. एका भांडय़ात अंडे फेटून घ्या. त्यात दूध घाला. आता नॉनस्टिकचा तवा गरम करा. त्यावर थोडं लोणी घाला. दूध आणि अंडय़ाच्या मिश्रणात ब्रेड बुडवून तो तव्यावर खरपूस भाजून घ्या. लोण्यावरच हा ब्रेड भाजायचा आहे. अगदी तळू नका, पण खुसखुशीत झाला की लगेच बाजूला काढा. त्यावर पिठीसाखर आणि दालचिनी पूड भुरभुरा. खायला घेताना या ब्रेडवर मध घालून खा. त्याची लज्जत नक्की वाढेल. यासोबत फळंसुद्धा खाऊ शकता.