[content_full]

कल्पना करा की, छान पावसाळी हवा आहे. नभ मेघांनी आक्रमलेलं आहे. आपल्याला सुट्टी आहे आणि आज बायकोनं ठरवलेल्या शॉपिंगच्या बेतावर पाणी पडलं आहे. बाहेर कुणाकडे जाण्याचा प्रश्नच नाहीये. घरी पाहुणे अचानक येऊन टपकण्याचं संकटही नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. टीव्हीवर आज आपल्या बायकोची, आईची, मुलीची, बहिणीची, कुठलीच आवडती सिरियल नाहीये. उलट, आपल्या आवडीचा सिनेमा (`सूर्यवंशम` सोडून कुठलाही!) लागला आहे. आजूबाजूला कुठलाही सण, उत्सव, समारंभ, वाढदिवस, निवडणूक, मिरवणूक, काही काही नसल्यामुळे डीजेही लागलेला नाहीये. हवेत एक मंद, कुंद गारवा आहे. जवळपास गुलाबी का कशी म्हणतात ती थंडी पडलेली आहे. आपल्या गॅलरीतून समोर दिसणारा निसर्ग अक्षरशः वेड लावतोय. बॉसनं अचानक फोन करून उद्या सकाळीच कुठलंही काम करण्याचं फर्मान सोडलेलं नाहीये. व्हॉटस अप ग्रुपवर कुठल्याही गहन विषयावरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. तुम्ही छान (चहाचेच!) घुटके घेत पाऊस बघत बसला आहात. अशावेळी तुमची बायको गरमागरम बटाटा-मटारवडा (म्हणजे व्हेज कटलेट!) आणून तुमच्यासमोर ठेवते! (बटाटावडा हे आपलं राष्ट्रीय खाद्य असल्यामुळे, व्हेज कटलेटला बटाटा-मटारवडा म्हटलं, की देशभक्ती आणखी वाढते, असं म्हणतात.) समोर ते गरमागरम पदार्थ पाहून तुमचा आनंद द्विगुणित होतो, जन्माचं सार्थक झाल्याचा फील तुम्हाला येतो आणि तुम्ही तिच्याकडे अत्यंत आदरानं, प्रेमानं, भरल्या डोळ्यानं पाहत राहता….! ती लाजते आणि म्हणते, “अहो, काय बडबडताय? कुणी केलंय व्हेज कटलेट? जरा स्वप्नातून भानावर या!“ तात्पर्य : हे स्वप्न साकार करायचं असेल, तर एकतर बायकोला कायमच आदर, प्रेम, सन्मान द्या, तुम्ही स्वतः तिच्यासाठी एखाद्या वेळी अशा प्रकारचा सुखद धक्का द्या, नाहीतर अशी स्वप्नच बघणं सोडून द्या.

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
How to remove Bad Smell From Dustbin with the help of five rupees
फक्त पाच रुपयांचा बेकिंग सोडा गायब करेन कचरापेटीतील दुर्गंधी, पाहा VIDEO
mystery girl with prithvi shaw
Video: क्रिकेटपटू पृथ्वी शॉबरोबरची ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
how to check purity of wheat flour
Kitchen Jugaad : गव्हाचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही, कसे ओळखायचे? ही सोपी ट्रिक लक्षात ठेवा

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य

  • १ शिजलेला बटाटा
  • १/२ वाटी मटार
  • १/४ वाटी गाजराचे तुकडे
  • १/४ वाटी फरसबीचे तुकडे
  • १ छोटा कांदा
  • १ टी स्पून लसूण पेस्ट
  • ५ टी स्पून हरभरा डाळीचे पीठ
  • ६-७ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार लाल तिखट
  • १ टी स्पून गरम मसाला
  • १ टी स्पून चाट मसाला
  • १ टी स्पून आमचूर पावडर
  • १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/४ वाटी भाजलेला रवा किंवा ब्रेडक्रम्स
  • 2 चमचे मैद्यामध्ये 4 चमचे पाणी घालून केलेले मिश्रण
  • तेल
  • मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती

  • मटार, गाजर, फरसबीचे तुकडे थोडे मीठ घालून वाफवून घ्यावेत. सर्व भाज्या चाळणीत काढून ठेवाव्यात जेणेकरून त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल.
  • नॉनस्टिक फ्राइंग पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट व मिरच्या बारीक करून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतला की त्यात चण्याचे पीठ घालावे, पीठ खमंग भाजून घ्यावे. शिजलेला बटाटा एका भांड्यात बारीक करून घ्यावा. त्यात सर्व वाफवलेल्या भाज्या, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ आणि भाजलेले पीठ घालून एकत्र करावे. पीठामुळे घट्टपणा येतो. पण कधी कधी बटाटा आणि इतर भाज्यांतील पाण्यामुळे जरा ओलसरपणा येण्याची शक्यता असते तेव्हा गरज वाटल्यास ब्रेड घालावा.
  • मिश्रणाचे समान भाग करून त्याला हाताने किंवा साच्याने आकार द्यावा. नॉनस्टिक फ्राइंग पॅनमध्ये १-२ चमचे तेल गरम करत ठेवावे. कटलेट मैद्याच्या पाण्यातून काढावे आणि नंतर कटलेटला भाजलेला रवा किंवा ब्रेडक्रम्स दोन्ही बाजूने लावून घ्यावा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन करून घ्यावे. पुदीन्याची चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावे, किंवा आपण खावे!

[/one_third]

[/row]