08 December 2019

News Flash

आरोग्यदायी आहार : खजूर लाडू

खजूर बी काढून स्वच्छ करावेत. बारीक कुस्करून घ्यावे.

डॉ. सारिका सातव

साहित्य

* खजूर एक ते दीड वाटी

* गुलकंद २ मोठे चमचे

* खिसलेले खोबरे दीड वाटी

* वेलची पूड पाव चमचा.

कृती

खजूर बी काढून स्वच्छ करावेत. बारीक कुस्करून घ्यावे. गुलकंद, खोबरे, वेलची व खजूर एकत्र करून चांगले मळून घ्यावे. मिश्रण एकसंध झाल्यावर छोटे छोटे लाडू करावेत.

वैशिष्टय़े

काहीही न शिजविता बनणारा पौष्टिक पदार्थ, रक्त कमी असणे, गर्भिणी, स्तनदा माता, लहान मुले, कृश व्यक्ती, पौगंडावस्थेतील मुले व मुली, क्षयरोग इ. अनेक ठिकाणी अतिशय उपयुक्त. पित्त कमी होण्यास उपयुक्त. आबालवृद्धांना चालणारा, जास्त दिवस टिकत असल्याने प्रवासातही उपयुक्त, लहान मुलांना छोटय़ा सुट्टीसाठी देता येऊ शकणारा उत्तम व पौष्टिक पदार्थ, लोह, तंतूमय पदार्थ व जीवनसत्त्व भरपूर.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on September 17, 2019 4:03 am

Web Title: khajur laddoo recipe khajur ladoo recipe in marathi zws 70
Just Now!
X