परदेशी पक्वान्न: नीलेश लिमये

ही फ्रेंच पाककृती आहे. फ्रेंचमधील पारंपरिक पाककृती आहे आणि त्यातील सॉस फार महत्त्वाचा आहे. तो उत्तम फेटल्यावर त्याला अपेक्षित टेक्श्चर मिळते. ज्यामुळे लॉबस्टर आणि भाज्यांची चव अधिक खुलते. लॉबस्टरची चव कशी असावी, तर ही अशी फेवरिट.

साहित्य

१ लॉबस्टर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा वाटलेली मोहरी, अर्धा चमचा लिंबूरस, अर्धा चमचा तेल, अर्धा चमचा वाटलेली लसूण, फ्लॉवर, ब्रोकोली, गाजर, झुकिनी आणि बेबीकॉर्न.

कृती

मीठ, मिरपूड, वाटलेली मोहरी, लिंबूरस आणि वाटलेली लसूण हे लॉबस्टरला लावून घ्या. थोडा वेळ मुरवण्यासाठी ठेवून द्या. आता सॉससाठी एका भांडय़ात बटर वितळवून घ्या. त्यात लिंबूरस घालून फेटून घ्या. आता भाज्या स्वच्छ धुऊन वाफवून घ्या आणि ज्या भांडय़ात सॉस बनवला आहे त्यातच या भाज्या थोडय़ाशा परतून घ्या. त्याला बटर आणि लिंबूरसाची छानशी चव येईल. आता लॉबस्टर ग्रील करून घ्या. त्यानंतर ५-७ मिनिटांकरिता ओव्हनमध्ये ठेवून २०० डिग्री से.ला बेक करून घ्या.

यानंतर वाढण्यासाठी लॉबस्टर कापून सव्‍‌र्ह करा, सोबत परतलेल्या भाज्या द्या. तसेच वरून थोडासा बटर सॉस वाढा. तुमची लॉबस्टर फेवरिट ही डिश तयार आहे.

nilesh@chefneel.com