शेफ नीलेश लिमये

शेफ नीलेश लिमये हे सॅलड एकदम परिपूर्ण आहे. सकाळी खाल्लंत तर उत्तम नाश्ता म्हणून, दिवसभर छान उत्साह टिकेल. नुसतं सॅलड आवडत नसेल तर सँडविच, पोळीची गुंडाळी किंवा भातासोबतही थोडे परतून ते खाता येईल.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

साहित्य

२५० ग्रॅम मशरूम्स, १ पिवळी सिमला मिरची, १ लाल सिमला मिरची, ४-५ लसूण पाकळ्या, १ चमचा ऑलिव्ह ऑइल, मीठ, मिरपूड, लिंबाचा रस.

अंडय़ाच्या मेयोनिझसाठी

३अंडय़ाचा पिवळा बलक, १०० ग्रॅम सॅलड ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल, १चमचा लिंबाचा रस, १चमचा मीठ, मिरपूड, साखर.

कृती :

* सर्वप्रथम मशरूमवरची माती साफ करा. माती जात नसल्यास त्यावर थोडा मैदा लावून पाण्याखाली धुऊन घ्या. धुतलेल्या मशरूमचे देठ कापून घ्या. लसूण आणि सिमला मिरच्या बारीक चिरून घ्या.

* एका भांडय़ात तेल गरम करून त्यात लसूण परता, त्या मशरूम घालून पुन्हा परता. ते खरपूस झाल्यावर त्यात सिमला मिरची घाला आणि छान अवसडून घ्या. त्यात चवीपुरती मीठ, मिरपूड घाला. आता ज्या भांडय़ात हे वाढणार आहात, त्यात घालून हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

* अंडय़ाच्या मेयोनिझसाठी

पिवळा बलक स्टीलच्या वाटीत काढा. तो चांगला पांढरट होईपर्यंत चमच्याने किंवा ब्लेंडरने फेटून घ्या. यात थोडं थोडं तेल घालून फेटा. फेटलेलं अंडं छान लुसलुशीत दिसेल. आता यात साखर, लिंबाचा रस, मीठ, मिरपूड घालून पुन्हा फेटा. आता याची छान चव येईल. हा सॉस मस्त सिल्की होतो. शिवाय चवीलाही छान लागतो. फ्रीजमध्ये ठेवून २-३ दिवस वापरताही येतो.

इकडे फ्रीजमध्ये ठेवलेले मशरूमचे मिश्रण बाहेर काढा. त्यावर वरून हे अंडय़ाचे मेयोनिझ घाला आणि सॅलड फस्त करा. शाकाहारी असाल तर व्हेज मेयोनिझ वापरा.