18 October 2019

News Flash

टेस्टी टिफिन : पौष्टिक डोसे

दोन्ही पिठे एकत्र करून त्यात साखर, मीठ आणि पाणी घालावे. हे मिश्रण सरसरीत करून रात्रभर आंबवायला ठेवावे

(संग्रहित छायाचित्र)

शुभा प्रभू साटम

साहित्य :

१ वाटी वरी तांदूळ किंवा साध्या तांदळाचे पीठ, १ वाटी कुट्टू धान्य पीठ (याच नावाने हे बाजारात मिळते.), पाणी, साखर, मीठ.

कृती

दोन्ही पिठे एकत्र करून त्यात साखर, मीठ आणि पाणी घालावे. हे मिश्रण सरसरीत करून रात्रभर आंबवायला ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्याचे डोसे किंवा घावन काढावेत. झटपट हवे असेल तर मग दोन्ही पिठे एकत्र करून त्यात थोडे दही, इनो आणि पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवावे. यानंतर मीठ घालून नेहमीच्या पद्धतीने डोसे करावेत. या डोश्यांमध्ये वेगळेपण हवे असल्यास मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो घालता येईल. गोडाचे डोसे हवे असतील तर पिठामध्ये मध, गूळ, खजुराची पेस्ट घालून डोसे करावे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on May 3, 2019 12:33 am

Web Title: nourishing dose recipe