05 August 2020

News Flash

  शेवळाची भाजी

प्रथम शेवळ आणि काकड नीट धुऊन घ्या. शेवळाचे साल आणि आतला पिवळा किंवा शेंदरी भाग काढून टाका.

|| अलका फडणीस

साहित्य

शेवळ २ जुडय़ा, काकड ४-५, हळद अर्धा चमचा, तिखट १ चमचा, चिंचेचा कोळ २-३ चमचे, कांदा १ बारीक चिरलेला, आलं-लसूणाचं वाटण २ चमचे, तेल अर्धी वाटी, तळलेला मसाला १ मोठा चमचा.

कृती

प्रथम शेवळ आणि काकड नीट धुऊन घ्या. शेवळाचे साल आणि आतला पिवळा किंवा शेंदरी भाग काढून टाका. शेवळ बारीक चिरा. काकड ठेचून बिया काढून टाका आणि मिक्सरमधून काढा. पातेल्यात तेल टाकून त्यावर हिंग घालून वर शेवळ घाला आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यावर वाटलेली काकड, कांदा, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ आणि पाणी घालून भाजी शिजवून घ्या. भाजी शिजल्यावर तळलेला मसाला, गूळ आणि मीठ घालून भाजी चांगली उकळवा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 1:59 am

Web Title: recipe shevlachi bhaji akp 94
Next Stories
1 ‘नऊ ते पाच’च्या प्रथेबाहेर
2 चलती का नाम.. : फिरण्याची ‘स्टाइल स्टेटमेंट’
3 पेटटॉक : स्वावलंबी ‘माऊ’ची देखभाल हवीच
Just Now!
X