डॉ. सारिका सातव साहित्य * ज्वारी- अर्धा वाटी, * उडीद डाळ- अर्धा वाटी * तांदूळ- अर्धा वाटी * मेथी दाणे- पाव चमचा * मीठ, तेल- चवीप्रमाणे कृती : ज्वारी धुऊन ६ ते ७ तास भिजवावी. तांदूळ व उडीद डाळही धुऊन चार तास वेगवेगळी भिजवावी. भिजवल्यानंतर डाळ, मेथी दाणे व मीठ मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. ज्वारी व तांदूळही वाटून घेऊन सर्व मिश्रण एकत्र करावे आणि सात ते आठ तास ठेवावे. मिश्रणात पाणी घालून डोसा करण्याजोगे करावे. तवा तापवून थोडे तेल लावून डोसे करावेत. चटणीबरोबर खाण्यास द्यावे. वैशिष्टय़े * या पदार्थामधून कॅल्शिअम, कबरेदके, प्रथिने मिळतात. * चवीस उत्तम असल्याने आबालवृद्धांना खाण्यास उपयुक्त. * लहान मुलांच्या तसेच मोठय़ांच्याही डब्यासाठी उपयुक्त.